आई कुठे काय करतेमधील अभिनेत्रीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

आई कुठे काय करतेमधील अभिनेत्रीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : स्टार प्रवाह चॅनलवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. १८ मे रोजी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या वडिलांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण १८ मे रोजी त्यांचे निधन झाले आहे.

अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. तसेच ती स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणू अक्का साहेब यांच्या भूमिकेत दिसली होती. टपाल आणि बॉइज या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.