बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन
क्रीडा

बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रशांत मोहापात्रा यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वर येथे अखेरचा श्वास घेतला, असे ट्वीट करत ओडिशा क्रिकेटने त्यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अशा प्रकारे ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बुधवारी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

प्रशांत मोहापात्रा यांनी ४५ प्रथम श्रेणी सामन्यांत ३०.८४च्या सरासरीने २१९६ धावा केल्या. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ४० घरगुती सामन्यांमध्येही ते रेफरी होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि हरभजन सिंगनेही प्रशांत मोहापात्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रशांत यांचे वडील रघुनाथ महापात्रा यांचेही कोविडमुळे ९ मे रोजी निधन झाले.