करीनाच्या दुसऱ्या मुलासाठी ‘या’ खास अभिनेत्रीने खरेदी केले गिफ्ट
मनोरंजन

करीनाच्या दुसऱ्या मुलासाठी ‘या’ खास अभिनेत्रीने खरेदी केले गिफ्ट

अभिनेत्री करीना कपूरने रविवारी सकाळी करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या तिचे चाहत्यासह अनेक सेलिब्रिटीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्मापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी अनेक गिफ्ट पाठवल्याचं आपण पाहिलं असेल. मात्र आता एका विशेष व्यक्तीकडून करीनाच्या बाळासाठी गिफ्ट घेण्यात आलं आहे. ती व्यक्ती म्हणजे सारा अली खान.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेत्री सारा अली खानने करीना आणि बाळासाठी खास गिफ्ट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.सध्या सोशल मीडियावर साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत असून तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

दरम्यान, करीना आणि सारा या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. अनेकदा या दोघी एकमेकींच्या फॅशन टीप्स शेअर करत असतात. बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली गट्टी आहे.

सारा अली खान अभिनेता सैफ अली खान आणि अमृताची मुलगी आहे. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने करीनाशी लग्न केले. मात्र तरीही दोन्ही कुटुंबांमध्ये सुसंवाद आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अनेकदा करीनाच्या घरी दिसतात.