अथिया शेट्टीच्या फोटोंवर भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
मनोरंजन

अथिया शेट्टीच्या फोटोंवर भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. शिवाय सोशल मीडियावर देखील ते एकत्र फोटो शेअर करत असतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता देखील अथियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. आथियाने शेअर केलेल्या फोटोंवर केएल राहुलने कमेंट केलं आहे. आथियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे अथियाने राहुलच्या वाढदिवसाच्या दिवसी ‘My Person’ असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत.

राहुल आणि आथियाच्या नात्याच्या यावरून चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वारसदार कोण, ही चर्चा ऐरणीवर आली होती. ऋषभ पंत जरी त्याची जागा घेण्यासाठी उत्सुक असला तरी फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्या यशस्वीपणे सांभाळू शकणाऱ्या के. एल. राहुललाच प्रथम पसंती मिळत असली होती. मात्र अशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतची वर्णी लागली आहे.