जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या थलायवी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्ताने थलायवी या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्रेलरमध्ये एका अभिनेत्री पासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सोबतच, कंगना आणि अरविंद स्वामी यांनी जयललिता आणि एमजीआर यांचे नाते कसे होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाने या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या भूमिकेत राहून उत्तम अभिनयासोबतच उत्तम डान्सही केला आहे. ट्रेलरमध्ये राजकीय जीवनात जयललिता यांना कोणत्या गोष्टींचा सामाना करावा लागला हे दाखवण्यात आले आहे. या भूमिकेसाठी कंगनाला २० किलो वजन वाढवावे लागले होते.

थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी प्रेस कॉन्फरसंचे आयोजन केले होते. यात कंगनासोबत दिग्दर्शक ए एल विजय, अरविंद स्वामी, नासिर, जीवी प्रकाश, समुथ्राकणी, थांबी रमैया देखील उपस्थित होते. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.