दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. परंतु काही दिलासादायक गोष्टी समोर येत असून राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नवीन कोरोनाबाधित वाढले तर, ३ हजार ५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत राज्यभरात एकूण १९ लाख ५२ हजार १८७ जण करोनामुक्त झाल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यात ३३ हजार ९३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्यात आज 2628 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3513 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1952187 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33936 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.76% झाले आहे.