सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल
मनोरंजन

सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : हरयाणाची डान्सर सपना चौधरीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एफआयआर दाखल केली आहे. सपनाच्या विरोधात एका फसवणुकीच्या प्रकरणात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता दिल्ली पोलीस लवकरच या प्रकरणात सपनाची चौकशी करण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सपना चौधरीनं कराराच्या अटी मोडल्या. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानं कंपनीचे ग्राहक देखील पळवले असा आरोप तक्रारदार कंपनीनं केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सपनाच्या आणि अन्य काही जणांच्या विरोधात IPC सेक्शन 420, 120B आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सपनानं मागच्या वर्षी 24 जानेवारी रोजी हरयाणातील लेखक आणि मॉडेल वीर साहूशी लग्न केलं होतं. तिनं मागच्याच महिन्यात आपल्या वर्ष वाढदिवसाचं साध्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं होतं. सपना आणि साहू हे गेल्या पाच वर्षांपासून रिलेशिनशिपमध्ये होते. मात्र त्यांनी ही बातमी सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. मागच्यावर्षी सपनाला मुलगा झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची आणि लग्नाची माहिती उघड झाली होती.