मोठी बातमी : राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल एवढ्या कोटी रुपयांचे दान
देश बातमी

मोठी बातमी : राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल एवढ्या कोटी रुपयांचे दान

अयोध्या : राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिरासाठी सतत दान येत असल्याचं सांगितलं. दान आलेली एकूण रक्कम जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. 1 लाख 50 हजार लोक धन संग्रह अभियानासाठी जोडले असल्याचंही त्यांनी सांगितलं. चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत झालं आहे. ज्या लेवलवर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून 5 मीटर खाली जमिनीचं खोदकाम झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च तर संपूर्ण परिसर विकास धरुन 1100 कोटी खर्च अपेक्षित आहे. निधी संकलनाच्या दुसऱ्या दिवशीच पैसे बँकेत भरले जाणार आहेत. निधीचा गैरवापर होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येत आहे. मंदिरासाठी केंद्र सरकार कसलीही आर्थिक मदत करणार नाही आहे. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होतील, असंही रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं होतं.