…म्हणून न्यूड फोटोशूट केलं; वनिता खरातचा खुलासा
मनोरंजन

…म्हणून न्यूड फोटोशूट केलं; वनिता खरातचा खुलासा

मुंबई : मराठी अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट करण्याचं धाडस केल्याचं अद्याप कोणाच्याही पाहण्यात नसेल. परंतु, या सगळ्याला अभिनेत्री वनिता खरातने छेद दिला. थेट न्यूड फोटोशूट करत वनिताने तिच्यातील आत्मविश्वास संपूर्ण कलाविश्वाला दाखवून दिला. त्यामुळेच सध्या तिची सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये चर्चा सुरु आहे. एकीकडे वनिताच्या आत्मविश्वासचं कौतुक होत आहे. तर, काही जणांनी तिच्यावर टीकादेखील केली आहे. त्यामुळेच तिने बोल्ड फोटोशूट नेमकं कोणत्या कारणासाठी केलं हे तिने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वनिताने तिच्या न्यूड फोटोशूटविषयी भाष्य केलं आहे. हे फोटोशूट करण्यामागे एक खास हेतू होता, असं तिने सांगितलं. वजन वाढल्यामुळे स्वत:ला कमी लेखणारे अनेक जण आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. वजन जास्त आहे, म्हणजे आपण सुंदर दिसत नाही अशी अनेकांची समजूत झालेली असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यातील आत्मविश्वास कमी असलेला दिसतो. यात पुरुष मंडळीही अपवाद नाहीत. मात्र, यात स्त्री वर्गामध्ये वजनाविषयी अनेकदा अस्वस्थता पाहायला मिळते. त्यामुळे मला त्यांच्या याच भावनेला, विचारसरणीला छेद द्यायचा होता, असं वनिता म्हणाली.

तुमचं वजन, तुमचा रंग, तुंमचा आकारमान यावर तुमचं सौंदर्य आधारित नसतं. आपण सगळेच सुंदर आहोत, हा साधा विचार स्वत:सह समाजात रुजवणं हाच माझा निव्वळ हेतू होता. पण लोकांचा प्रश्न होता की न्यूड फोटोशूटच का? तर, यात काय वाईट आहे. जन्मत: आपण सगळेच नग्न असतो. मग, त्या नग्नतेला अश्लील मानायचं का? कलाविश्वात वजानामुळे भेदभाव, हेटाळणी सहन करावी लागल्याचंदेखील तिने सांगितलं. मला सतत आई, काकू, मोलकरीण अशाच भूमिकांसाठी विचारलं जातं, असेही तिने स्पष्ट केले.