मुंबई सागा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अपयशी
मनोरंजन

मुंबई सागा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अपयशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा मुंबई सागा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनचा भरणा असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत मुंबई सागा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये किती कमाई केली आहे याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाने २.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंबई सागा चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रामध्ये चित्रपटाने अधिक कमाई करणे अपेक्षित होते.

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा मुंबई सागा या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. या चित्रपटात जॉन आणि इम्रानसोबत काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बरस रोनित रॉय, गुलशन ग्रोवर आणि अमोल गुप्ते हे कलाकार देखील आहेत.