जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी
बातमी मराठवाडा

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी

हिंगोली : जात प्रमाणपत्रासाठी कोणत्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नसल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले आहे. शेवाळा येथे महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिंगोलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळा येथे कळमनुरी उपविभागीय कार्यालयामार्फत महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत 79 शाळेतील 5820 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर, जिल्हा पोलीस अधिक्षक, राकेश कलासागर, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर साहेब, कळमनुरी तहसीलदार मयुर खेंगळे, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, जील्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, रावसाहेब सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवरानी नरवाडे, नगरसेवक रामभाऊ कदम, सरपंच सीमा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.