मोठी राजकीय घडामोड; माजी केंद्रीय मंत्री भाजपनेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
मनोरंजन

मोठी राजकीय घडामोड; माजी केंद्रीय मंत्री भाजपनेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

कोलकाता : एकेकाळी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमकी यामागे तृणमूल काँग्रेसची काय चाल आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकेकाळी भाजपच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.

भाजपला रामराम ठोकल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या ऐन महिनाभर आधी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे किती फायदा होईल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.