दृश्यम 2ला मोठा झटका; प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत घडली ही गोष्ट
मनोरंजन

दृश्यम 2ला मोठा झटका; प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत घडली ही गोष्ट

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि मीना यांचा दृश्यम 2 हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला एक मोठा झटका बसला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो ऑनलाइन लीक झाला आहे. तमिळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केल्याचं सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या चित्रपटापूर्वी तमिळरॉकर्सने अनेक चित्रपट लीक केले आहेत. यात उप्पेना, लाहोर कॉन्फिडेंशिअल, तांडव, मास्टर, क्रॅक, लक्ष्मी, आश्रम, लुडो, रसभरी, पाताल लोक, गुलाबो सिताबो, घुमकेतू असे अनेक चित्रपट प्रदर्शनापूर्वी किंवा प्रदर्शनानंतर काही तासांत लीक झाले आहेत.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाचा हा रिमेक असून तो २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे हा चित्रपट फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र, प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांमध्ये तो लीक झाला आहे. हा चित्रपट सध्या टॉरंट, टेलीग्रामवर प्रदर्शित झाल्याचं दिसून येत आहे.