साध्या इशाचा सेक्सी लूक होतोय व्हायरल; फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

साध्या इशाचा सेक्सी लूक होतोय व्हायरल; फोटो एकदा पाहाच

मुंबई : अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच इशा ही तशी पाहिली तर प्रेक्षकांच्या भेटीला साध्या भोळ्या वेशातच समोर आली, पण आता तिचा एक सेक्सी आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला असून तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘तुला पाहते रे’ या मालिकेतून इशा म्हणजेच गायत्री महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. सुबोध भावे आणि गायत्री यांच्या वयातील अंतर हा या मालिकेबाबतचा चर्चेचा विषय ठरला होता. गायत्रीने आपल्या पहिल्याच बिग बजेट मालिकेत अभिनयाची छाप सोडली आणि साऱ्यांनी तिची वाहवा केली. गायत्रीने केलेली इशा ही भूमिका अत्यंत साधी-भोळी मुलगी अशी होती. पण सध्या मात्र गायत्री तिच्या एका ‘बोल्ड अँड सेक्सी’ अशा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

गायत्रीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे. इन्स्टाग्रामवरील ५००व्या पोस्टचं निमित्त साधून तिने तिचा बोल्ड पोस्ट केला आहे. गायत्रीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तो ड्रेस घातलेले एकूण ४ फोटो तिने पोस्ट केले आहेत.