हॅपी बर्थडे टायगर श्रॉफ! तुम्हाला माहित आहे का टायगर’चं खरं नाव ?
मनोरंजन

हॅपी बर्थडे टायगर श्रॉफ! तुम्हाला माहित आहे का टायगर’चं खरं नाव ?

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला टायगर श्रॉफ’चा आज वाढदिवस आहे. टायगर हा अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. पण टायगर आणि त्याच्या वडिलांची स्टाईल ही खूपच वेगळी आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या दोघांच्या अभिनयशैलीत देखील खूप फरक आहे. यामुळेच लाखों तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. टायगरने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये त्याची एक ओळख निर्माण केली आहे. पण तरीही त्याच्या वडिलांइतकीच त्याला लोकप्रियता मिळाली आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का टायगर श्रॉफ चा खरं नाव काय आहे?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टायगरने हिरोपंती सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. टायगर’ या नावामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. जॅकीचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. जॅकी श्रॉफने खूप लहान वयातचा आपल्या या भावाला गमावले होते. त्याच्यासमोरच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याचमुळे आपल्या भावाची आठवण कायम ठेवण्यासाठी त्याने आपल्या मुलाचे नाव त्याने हेमंत ठेवले होते.

मात्र हेमंत हे नाव बदलून टायगर हे नाव ठेवण्यामागे एक रंजक किस्सा आहे. लहानपणीची टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याने अनेकदा आईचा मारही खाल्ला आहे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशी त्याची चावायची सवयही वाढत गेली. कुटुंबातील व्यक्ती असो वा बाहेरचे पाहुणे, तो सर्वांनाच चावायचा. त्यामुळे जॅकी श्रॉफने त्याचे नाव टायगर असे ठेवले.

एकदा टायगरची लहान बहीण कृष्णा आणि टायगरमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी टायगरने कृष्णाचा इत्कदा जोरात चावा घेतला की, तिला डॉक्टरकडे न्यावे लागले. यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची खायला लावली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची खायला लावायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.