मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता इम्रान हाश्मी बिग बींसोबत चेहरे या चित्रपटात पहिल्यांदाच काम करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बिग बी आणि इम्रानला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
इम्रान हाश्मीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चेहरे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या ४५ सेकंदाच्या टीझरमध्ये अनू कपूर, इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांचा आवज ऐकू येत आहे. तिघे ही गुन्हेगारी, न्याय आणि इमानदारी यावर बोलताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर चर्चेत असून व्हायरल झाला आहे. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबची उत्सुकता वाढली आहे.
Are you ready to #FaceTheGame? Kyuki iss adaalat mein khel ki shuruaat ho chuki hai.#ChehreTeaser out now: https://t.co/5vOUYBO76Y
Dekhiye #Chehre in cinemas, 9th April pic.twitter.com/Ax229iBwMg
— Emraan Hashmi (@emraanhashmi) March 11, 2021
९ एप्रिल २०२१मध्ये चेहरे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. चेहरे चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फैज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जाते.