तर, ती स्त्री प्रत्येक रूपात सुंदर दिसते; बेबी बम्प फोटोशूट करत अनुष्काचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर
मनोरंजन

तर, ती स्त्री प्रत्येक रूपात सुंदर दिसते; बेबी बम्प फोटोशूट करत अनुष्काचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर

अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली सध्या आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अनुष्का आणि विराटच्या घरी केव्हाही बाळाचे आगमन होऊ शकते. अनुष्का देखील आपल्या गरोदरपण चांगलेच एन्जॉय करताना दिसत आहे. अनुष्काने तिच्या गरोदरपणातील सुंदर दिवसांची आठवण म्हणून नुकतेच एक फोटोशूट केले. गरोदरपणात वोग इंडिया या मॅगझिनसाठी तिने केलेले फाटोशूट. होय, तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण या फोटोशूटमुळे अनुष्काला जबरदस्त ट्रोलही केले जातेय. या फोटोत अनुष्का बोल्ड अंदाजात बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अनुष्काने स्वत: यापैकी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी या फोटोंचे कौतुक केले. पण काहींनी मात्र यावरून अनुष्काला चांगलेच फैलावर घेतले.

https://www.instagram.com/p/CJbKzARJncS/?utm_source=ig_web_copy_link

या असल्या फोटोशूटची खरोखरच गरज आहे का?असा सवाल एक इन्स्टाग्रामरने केला. अन्य एकाने करायचे तर फोटोशूट कर, पण हे असले फोटो पब्लिकला कशाला दाखवतेस, अशा शब्दांत तिला फटकारले. काहींनी अनुष्का व विराट आपल्या न जन्मलेल्या मुलाची जाहिरात करत असल्याची, न जन्मलेल्या मुलाच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याची टीका केली.

https://www.instagram.com/p/CJaywc2ps9U/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोशूटद्वारे अनुष्काने आपल्या मातृत्त्वाच्या भावना तिच्या चाहत्यांसमोर व्यक्त केल्या आहेत. अनुष्का फक्त बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी नव्हते तर नेहमी काहीतरी नवीन आणि वेगळं करण्यासाठी देखील ओळखली जाते. वयाच्या 25 व्या वर्षी निर्माता होणारी ती पहिली महिला आहे आणि वयाच्या 29 व्या वर्षी लग्न करून अनुष्काने सर्वांसमोर एक उदाहरण मांडलं की लग्न तुमच्या कोणत्याही यशाच्या मध्ये येऊ शकत नाही. अनुष्काने बॉलिवूडमध्ये हा संदेश आपल्या सर्वोत्कृष्ट फोटोशूटद्वारे दिला आहे.

https://www.instagram.com/p/CJbLEBGpXM1/?utm_source=ig_web_copy_link

मात्र अनुष्काने फोटोशूटच्या माध्यमातून ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ”गर्भवती महिलांनी सार्वजनिकपणे आपले प्रदर्शन करू नये आणि कोणते कपडे घालू नयेत. तसेच जर एखाद्या स्त्रीकडे धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर ती प्रत्येक रूपात सुंदर दिसते. त्यामुळे एखाद्या गर्भावस्थेत स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे आयुष्य जगले पाहिजे हे सांगण्याचा अधिकार नाही. असेही तिने या फोटोशूटमधून दाखवून दिले आहे.

तर दुसरीकडे विराट सध्या पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात आला आहे. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटली मध्ये लग्न केले.