मोठी बातमी : जया बच्चन पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम
मनोरंजन

मोठी बातमी : जया बच्चन पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री जया बच्चन यांनी 1973 साली बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. तेव्हापासून काही मोजके चित्रपट वगळता त्या सिनेसृष्टीत फारशा झळकल्या नाहीत. 2013 साली सनग्लासेस या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. मात्र आता तब्बल सात वर्षानंतर त्या सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे जया बच्चन या कुठल्याही हिंदी नव्हे तर चक्क मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शी द पीपल या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे करणार आहेत. त्यांनी आजवर अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित केलेलं नाही.

सध्या या चित्रपटाच्या पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. परंतु हा मराठीतील एक बिग बजेट चित्रपट असेल अशी चर्चा आहे. शिवाय या चित्रपटात जया बच्चन एक महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.