सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?
मनोरंजन

सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?

‘बस्ता’ चित्रपटातील ‘फुल झुलत्या येलीचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच सोशल मीडिया वर सायली संजीव अभिनीत ‘बस्ता’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज ह्याच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अजय गोगावले आणि दीपाली साठे यांनी गायले असून मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित होत आहे.