कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’
मनोरंजन

कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशाच सर्व वादांमध्ये तिनं आपल्या फिल्मचा धडाकाही सुरूच ठेवला आहे. कंगनानं नुकतंच थलाईवीचं शूटिंग पूर्ण केलं आणि आता तिनं आणखी एका राजकीय फिल्मची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना रणौत आता भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. तिनं स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फिल्मचं नाव अद्याप माहित नाही. पण थलाईवीप्रमाणे ही बायोपिक नाही, असं सांगण्यात आलं आहे. कंगना फक्त या फिल्ममध्ये अभिनय करणार नाही, तर ही फिल्म प्रोड्युसही करत आहे.

Kangana Ranaut Dailyच्या ट्विटनुसार, आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि लवकरच या फिल्मची स्क्रिप्ट पूर्ण होणार आहे. ही फिल्म इंदिरा गांधी यांची बायोपिक नाही तर एका मोठ्या कालावधीची अशी फिल्म असेल. जी आजच्या पिढीला देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीबाबत नीट माहिती देईल. कंगना ट्विट केलं आहे की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी या आयकॉनिक महिलेच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं होतं. मला माहिती होतं एक दिवस मी या आयॉनिक लीडरची भूमिका स्क्रिनवर साकारेन. या फिल्मची स्टोरी आणि स्क्रिनप्ले दिग्दर्शक साई कबीर यांनी लिहिलं आहे, जे ही फिल्म दिग्दर्शित करणार आहेत. एका पुस्तकावर ही फिल्म आधारित आहे.