केवळ ५०० रुपयांना गंगुबाई काठीयावाडी यांना विकलं होतं नवऱ्याने
मनोरंजन

केवळ ५०० रुपयांना गंगुबाई काठीयावाडी यांना विकलं होतं नवऱ्याने

हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर आधारित दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. काहीना या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भट प्रचंड आवडली. तर काहींनी आलियाला या रोलमध्ये चक्क ‘फेल’ केले. या रोलमध्ये आलिया कुठेही फिट बसत नाही, असे कोणी लिहिले. तर ‘तू स्टुडंट ऑफ द ईअर ही रह बहन,’ अशा शब्दांत आलियाला ट्रोल केले. ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियात मोठे नाव होते. गांगुबाईच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकल्याचे सांगितले जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ही गंगूबाई कोण होती असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. याच गंगुबाईबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गुजरातमधील काठीयावाडी याठिकाणी गंगूबाईचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गंगुबाई हरजीवनदास. गंगुबाई १६ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांकडे अकाऊंटट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर त्या त्यांच्यासोबत मुंबईला पळून आल्या. पण सुखी संसाराचे स्वप्न पाहाणाऱ्या गंगूबाईंना त्यांच्या पतीनेच 500 रुपयांत विकले आणि त्यांना वेश्याव्यसायात ढकलून दिले. मुंबईत वेश्याव्यवसाय करत असताना अनेक कुख्यात गुंड त्यांच्याकडे ग्राहक म्हणून येत असत.

एक दिवस कुंटणखान्यामध्ये आलेल्या एका पठाणाने गंगुबाईंशी गैरवर्तन केलं. त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना शारीरिक इजा तर केली होती, पैसेही दिले नव्हते. हे पुन्हा पुन्हा घडत होते. अखेरीस या पठाणाविषयी गंगूबाईंनी माहिती काढली. त्यावेळी त्या पठाणाचे नाव शौकत खान असून तो करीम लाला गँगचा असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर गंगूबाईंनी करिम लालाची भेट घेऊन घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यावर करिम लालाने गंगूबाईंचे संरक्षण करण्याचे त्यांना वचन दिले. यानंतर करिम लाला गंगूबाईंना आपली बहीण मानू लागले. या घटनेमुळे गंगूबाईचा कामाठीपुरा परिसरातील दरारा वाढला.

गंगूबाईना याचा खूप फायदा झाला. गंगूबाई वेश्यागृहातील मुलीना त्यांच्या इच्छेनुसार ठेवत असत. गंगूबाईंनी सेक्सवर्कर्स आणि अनाथ मुलांसाठी बरेच काम केले.वेश्यांना गंगूबाई आईसारख्या वाटायच्या. तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. मुंबईत फसवून आणल्या जाणाऱ्या अनेक मुलींना त्यांनी घरी परतण्यास मदत केली होती.