अभिनय सोडून अर्चीचा परश्या करतोय शेती? आकाश ठोसरचा ‘तो’ फोटो व्हायरल
मनोरंजन

अभिनय सोडून अर्चीचा परश्या करतोय शेती? आकाश ठोसरचा ‘तो’ फोटो व्हायरल

‘सैराट’ मुळे अर्ची आणि परश्या हे दोघेही आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आहेत. सैराट नंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले. मात्र आता परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरचे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. यात परश्या शेतीत राबताना दिसत आहे. हा फोटो पाहून सुरवातीला अभिनय सोडून परश्याने शेतीकडे वळला की काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/CLMUMqKpAsV/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत परश्या बैलाला आंघोळ घालताना आणि चारा वेचताना दिसत आहे. आकाश खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध फोटो व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या आकाशने असेच काही फोटो शेअर केलेत आणि चाहते हैराण झालेत. आकाश नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतो. हे फोटो पाहून आकाश अभिनय सोडून शेती का करतोय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण आकाश शेती करत नसून व्हायरल झालेले हे फोटो आकाशच्या नव्या वेबसीरिजचे आहेत.

https://www.instagram.com/p/CLjdd6xpP9D/?utm_source=ig_web

आकाश लवकरच ‘1962 – द वॉर इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजच्या सेटवरचे हे फोटो आहेत. आकाश या वेबसीरिजमध्ये किशन नावाच्या आर्मी आॅफिसरची भूमिका साकारत आहे. आता तो नव्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिज व्यतिरिक्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळाली आहे.

https://www.instagram.com/tv/CLTnRagpgIM/?utm_source=ig_web

याआधीही आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
‘सैराट’ हा आकाशचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटापासूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाने तरुणाईला अगदी वेड लावले. या चित्रपटामधील आर्ची-परशाची जोडी तर आजही तितकीच प्रसिद्ध आहे. मात्र या वेबसिरीजसाठी आता आकाशचा पूर्णच कायापालट केला आहे.