अपूर्वा नेमळेकरचे पारंपारिक पोशाखातील ते फोटो व्हायरल; चाहतेही घायाळ
मनोरंजन

अपूर्वा नेमळेकरचे पारंपारिक पोशाखातील ते फोटो व्हायरल; चाहतेही घायाळ

रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या शेवंताने अपूर्वा नेमळेकर) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची भूमिकाअभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी अंदाजामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अपुर्वाने नुकताच तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. सध्या सोशल मीडियावर अपूर्वाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. तिच्या फोटोने तर चाहत्यांचे लक्ष वेधले आहेच पण कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेअर केलेल्या फोटोत पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी गुजराती कलाकुसरही पाहायला मिळत आहे. तिचा मेकअप गुजराती लूकला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CLi0DEEnyfv/?utm_source=ig_web

पारंपरिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. शिवाय दागदागिने आणि मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. आजवर अशा अंदाजात अपूर्वाला आपण ऑनस्क्रीन कधीच पाहिलेलं नाही. हा लूक प्रेक्षकांसाठीही नवीनचं आहे. आता या गुजराती लूकमधून ती रसिकांच्या काळजाचा ठाव घेत आहे.

अपूर्वा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. इतकेच नव्हे तर, आपल्या खासगी आणि मालिकांविषयी तसंच आगामी प्रोजेक्टची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. या फोटोमुळे शेवंता या भूमिकेनंतर ‘तुझ माझं जमतंय’ या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली.

ही मालिका सुरू होऊन काही महिनेच झाले असताना अचानक अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सीएनएक्स फिल्मी टीमशी बोलताना अपूर्वा म्हणाली की, माझ्या पर्सनल रिझनमुळे ही मालिका मी सोडत आहे. एका ब्रेकची मला गरज होती त्यामुळे हा डिसिजन मला घ्यावा लागला.