रामायणमधून ऋतिकला डच्चू? दीपिकासोबत मुख्य भूमिकेत झळकणार हा सुपरस्टार
मनोरंजन

रामायणमधून ऋतिकला डच्चू? दीपिकासोबत मुख्य भूमिकेत झळकणार हा सुपरस्टार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रामायण या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून आता ऋतिक रोशनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मधु मंटेना हे करणार आहेत. मुख्य भूमिकेत बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन दिसणार अशी चर्चा होती. पण या चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतिक रोशनऐवजी दक्षिणात्य अभिनेता महेश बाबूची एन्ट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रामायण या बीग बजेट चित्रपटात रामाची व्यक्तिरेखा साकारताना सुपरस्टार महेश दिसू शकतो. तर दीपिका पादुकोण सीतेची भूमिका निभावणार आहे. दिग्दर्शक मधु मंटेना यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे या चित्रपटात स्टार कलाकारांना संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी महेश बाबूसोबत बोलणी सुरू आहेत. महेश बाबूला या चित्रपटाची पटकथा खूपच आवडली असून त्यांनी अद्याप होकार दर्शवला नाही. या पार्श्वभूमीवर ऋतिक रोशनला मुख्य भूमिकेतून का हटवलं? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. कारण, या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

मधु मंटेना यांना स्टार कलाकार घेण्यासाठी Kwaan या एजन्सीची मदत मिळत आहे. असंही म्हटलं जात आहे की, या चित्रपटात व्हिलनची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी ऋतिकने होकार दर्शवला आहे. त्यामुळे तो मोठ्या पडद्यावर आपल्याला रावणाच्या भूमिकेत दिसू शकतो. पण अद्याप या चित्रपट निर्मात्यानी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या रामायणावर अधारित दोन चित्रपटांवर काम सुरू आहे. एक चित्रपट ‘आदिपुरूष’ आणि दुसरा मधु मंटेना यांचा रामायण हा चित्रपट आहे.