शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण
क्रीडा

शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी शाहबाज नदीमला टीममधून बाहेर ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टेस्टआधी अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांना टीममध्ये घेण्यात आलं होतं. पण आता अक्षर पटेल फिट झाला आहे आणि दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. अक्षर पटेल फिट झाल्यामुळे तो शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळेल, हे जवळपास निश्चित आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अक्षर पटेलने भारतासाठी 38 वनडे आणि 11 टी-20 मॅच खेळल्या आहेत. पण टेस्टमध्ये मात्र त्याला अजून संधी मिळाली नव्हती. आता नदीमच्या जागी अक्षर पटेलला खेळवलं, तर कुलदीप यादवला पुन्हा बाहेरच बसावं लागेल. पहिल्या टेस्टमध्ये शाहबाज नदीमला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने तब्बल 233 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तसंच 9 नो बॉलही टाकले. अक्षर पटेल फिट झाल्यामुळे आता शाहबाज नदीम आणि राहुल चहर हे दोघं पुन्हा एकदा टीम इंडियाच्या स्टॅण्डबाय खेळाडूंमध्ये गेले आहेत.

भारतीय टेस्ट टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

स्टॅन्डबाय खेळाडू
केएस भारत, अभिमन्यु ईश्वरन, शाहबाज नदीम, राहुल चाहर, प्रियांक पांचाळ

नेट बॉलर
अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार