रितेश देशमुखने केलं प्रीती झिंटाला कीस; मग जेनेलीयाने केलं असं काही की….
मनोरंजन

रितेश देशमुखने केलं प्रीती झिंटाला कीस; मग जेनेलीयाने केलं असं काही की….

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा अत्यंत गोंडस जोडपे आहेत. दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वश्रुत आहे. हे दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमांतून आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असतात. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. मात्र नुकताच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. जो त्यांच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, आता असा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख हेग करत आणि अभिनेत्री प्रीती झिंटाला चुंबन घेताना दिसत आहे, ज्यामुळे जेनेलियाची मनःस्थिती अस्वस्थ होते आणि मग ती त्याचा समाचार घेते. हा व्हिडीओ जुना असला तरी या व्हिडीओ नंतर काय घडले, हे जेनेलियाने या व्हिडीओत दाखवले आहे. जेनेलियाने घरी आल्यावर रितेशला क्या किया क्या किया म्हणत मारण्याची एक्शन केली.

https://twitter.com/geneliad/status/1372819337485029382?s=20

या व्हिडीओत पहायला मिळतंय की, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला भेटल्यावर तिच्या बोलून झाल्यावर तिच्या हाताची किस घेताना दिसतो आहे आणि हे सगळे एका बाजूला उभी राहून जेनेलिया पाहताना दिसते आहे. खरेतर हा जुना व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. पण जेनेलिया देशमुखच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटीही कमेंट्स करत आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा नेहमी मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि चाहतेही त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत असतात. रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.