या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; केले हे आवाहन
मनोरंजन

या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; केले हे आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली असून चाहत्यांना कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये असे आवाहन तिने सोशल मीडियाद्वारे केले आहे. तब्बूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने माझे अकाऊंट हॅक झाले आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका असे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधीकधी कलाकारांना हॅकिंगचा सामना देखील करावा लागतो. यापूर्वी देखील अनेक बॉलिवूड कलाकरांना हॅकिंगचा समाना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनने तिची मुलगी रिनीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचे सांगितले होते. स्क्रीनशॉट शेअर करत सुष्मिता म्हणाली, हॅक, कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. माझी मुलगी रिनीचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी हॅक केले आहे.

दरम्यान, तब्बू लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात तब्बू सोबत अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तिने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि अलाया फर्नीचरवाला हे मुख्य भूमिकेत दिसले होते.