फिल्मस्टार हत्तीचं निधन; चाहत्यांकडून हळहळ
मनोरंजन

फिल्मस्टार हत्तीचं निधन; चाहत्यांकडून हळहळ

मुंबई : फिल्मस्टार असणाऱ्या हत्तीचे निध झाल्याने चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या केरळच्या प्रसिद्ध मंगलमकुन्‍नू कर्णन हत्तीचं निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये दु:ख व्यक्त केलं जात आहे. 28 जानेवारी रोजी मंगलमकुन्‍नू कर्णनचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंगलमकुन्‍नू कर्णन 60 वर्षांचा होता. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकल्याही होत्या. या हत्तीने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मंगलमकुन्‍नू कर्णनला 1991 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसीतून केरळमध्ये आणण्यात आलं होतं.

केरळमध्ये मंगलमकुन्‍नू कर्णन अतिशय लोकप्रिय होता. त्याच्या मालकांचं नाव मणिसिर्ल हरिदास आहे. त्यांनी मंगलमकुन्‍नू कर्णन हत्तीला 2000 रुपयांत खरेदी केलं होतं. मंगलमकुन्‍नू कर्णन हत्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनानंतर संपूर्ण रिवाजानुसार अंतिम संस्कार केले गेले. मंगलमकुन्‍नू कर्णन हत्तीने चित्रपटांसह अनेक टेलिव्हीजन जाहीरातींमध्येही काम केलं आहे. मंगलमकुन्‍नू कर्णन हत्तीने चित्रपटांसह अनेक टेलिव्हीजन जाहीरातींमध्येही काम केलं आहे.