झुंज संपली; दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन
मनोरंजन

झुंज संपली; दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन झालं. ते ३८ वर्षाचे होते. बाइकवरून घरी येत असताना अचानक संचारी विजय यांची बाइक घसरून अपघात घडला होता. शुक्रवारी रात्री हा अपघात घडल्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आलं. यात त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला जबर मार बसल्यानं ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतू अखेर काळाने घाला घातला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निधनानंतर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कोरोना काळात अभिनेता संचारी विजय हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची मदत करताना दिसून आले होते. यूसायर या टीमसोबत काम करून त्यांनी कोरोनाबाधितांना ऑक्सिजन देखील पुरवलं होतं. लोकांच्या संकट काळात मदतीला आलेले संचारी विजय यांच्यावरच काळाने घाला घातला.

कन्नड अभिनेता सुदिपने ट्विट करत संचारी विजय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, संचारी विजयचा मृत्यू झाला हे खूपच दुःखद आणि निराशाजनक आहे. या लॉकडाउनपूर्वी त्याला फक्त दोनदाच भेटलो. त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल उत्सुक होता, जो रिलीज होणार आहे. मी अतिशय दु:खी आहे. त्याच्या कुटूंबाच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.