गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चंद्रमुखीचा ‘टीझर’ रिलीज!
मनोरंजन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चंद्रमुखीचा ‘टीझर’ रिलीज!

पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस मुहूर्त साधत हा टीझर रिलीज करण्यात आला. ‘चंद्रमुखी’च्या या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट – ‘अजय अतुल’ यांच्या संगीताची हलकिशी लकेर आपल्याला या चित्रपटाचं गुपित कानात गुणगुणतं ठेवेल.

निर्माते अक्षय बर्दापूरकर व त्यांचा भारतातील पहिला-वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म-प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे ‘फ्लाईन्ग ड्रॅगन’ हे सह-निर्माते आहेत. ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांच्या पाठोपाठ आता ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या निर्मितीतही ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ निर्माते म्हणून एकत्र आहेत. या चित्रपटाची, पटकथा आणि चिन्मय मांडलेकर यांचे संवाद लेख संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, अजय-अतुलचं संगीत आणि चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्लॅनेट मराठीच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झालेला ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरला आहे.