कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…
मनोरंजन

कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…

नवी दिल्ली : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात झालं. देशभरातील अनेक सेलिब्रिटी, कलाकारांनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कोणी घराबाहेर पासून एन्जॉय केलं तर कोणी घरातच पार्टी केली. मात्र अभिनेत्री कंगना रानौतने पार्टी न करता घराची साफ-सफाई करून सरत्या वर्षाला निरोप देण पसंत केलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३१ डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंगना रणौत तिचं वार्डरोब आणि घर स्वच्छ करण्यात बिझी होती. कंगनाने तिचं कॅबिनेट स्वच्छ करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिचे शेकडो सॅंडल, शूज स्वच्छ करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, ”जेव्हापासून मी घरी परतली आहे तेव्हापासून फक्त सफाईच करत आहे. असे म्हणतात की, ज्या वस्तू तुमच्या असतात, त्यांच्या तुम्हीही असता. आपल्या सामानाची सतत सफाई केल्यावर मला जाणीव झाली की, जशी मी त्यांची गुलाम आहे. आशा आहे की, आज माझं काम संपेल आणि २०२१ मध्ये मी एका क्वीनसारखी एन्ट्री घेईन’.

कोरोना व्हायरसमुळे बरेच दिवस मनालीत आपल्या घरीच होती. पण ती नुकतीच मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच तिने आधी सिद्धीविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. ती लवकरच ‘धाकड’ सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. त्यासोबतच कंगना ‘थलायवी’ आणि ‘तेजस’ सिनेमात दिसणार आहे.

दरम्यान, सुमारे अडीच महिन्यांनंतर कंगना रानौत नुकतीच मुंबईत आली आहे. मुंबईत पोहोचल्यावर सर्वात आधी तिने मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतली. कंगणाचे सिद्धीविनायक मंदिरातील एक फोटोदेखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर लिहिले की, “सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.