कतरिनाची बहिण करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण; कोणत्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
मनोरंजन

कतरिनाची बहिण करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण; कोणत्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबतच आता तिची लहान बहिण इसाबेल कैफदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव सुस्वागतम खुशामदीद असं आहे. न्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नमस्ते, आदाब आपण लवकरच ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटाच्या निमित्तानं भेटणार आहोत.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट तिने लिहिली आहे. या आगामी चित्रपटात इसाबेलसोबत अभिनेता पुलकित सम्राट मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रसिद्ध अभिनेता धिरज कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

हा एक रोमँटिक कॉमेडीपट असून मुंबईमध्ये सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. या पोस्टरमध्ये इसाबेल आणि पुलकितचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. कतरिना कैफचे चाहते देखील तिच्या लहान बहिणीचा अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कतरिना कैफ ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकांनी या पोस्टरवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.