रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही
मनोरंजन

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही

हैद्राबाद : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून तूर्तास त्यांना डिस्चार्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रजनीकांत यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिवसभरात त्यांच्या तब्येतीमध्ये काय फरक पडला आहे, याबाबत रुग्णालयानं माहिती दिली आहे. अपोलो रुग्णालयाच्या नव्या हेल्थ बुलेटिननुसार रजनीकांत यांना रक्तदाब नियंत्रणाची औषधं देण्यात आली आहेत. आज रात्री ते रुग्णालयात राहतील. उद्या पुन्हा त्यांची पुढील तपासणी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना आरामाची गरज आहे. ते कुणालाही भेटणार नाहीत. त्यांची मुलगी त्यांच्यासोबत आहे, ती त्यांची काळजी घेते आहे. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी कुणीही रुग्णालयात येऊ नये, असं आवाहन त्यांचं कुटुंब आणि रुग्णालय प्रशासनानं केलं आहे.

गेल्या 10 दिवसांपासून ते हैद्राबादमध्ये अन्नाथे या सिनेमाचं शूटिंग करत होते. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैद्राबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं आहे.