टकाटकनंतर आता येतोय टकाटक २; मोशन पोस्टर लॉन्च
मनोरंजन

टकाटकनंतर आता येतोय टकाटक २; मोशन पोस्टर लॉन्च

मुंबई : टकाटकच्या यशानंतर आता पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि. च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी टकाटक २ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी समाजमाध्यमातून टकाटक २चं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टकाटकची कथा तरुणाईवर आधारित होती. मनोरंजनातून तरुणाईला एक संदेश देण्याचा प्रयत्नही चित्रपटातून करण्यात आला होता, त्यामुळे टकाटक २ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच टकाटक २ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. टकाटक २मधील कलाकार कोण असतील हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

टकाटक या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने टकाटक २च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. दरम्यान, टकाटकने विक्रमी व्यवसाय करत २०१९ च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आता टकाटक २ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.