धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
मनोरंजन

धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : बिग बॉस कन्नडची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री चैत्रा कोट्टूर हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागार्जुननेदेखील काही लोकांच्या दबावामुळे हे लग्न केल्याचं म्हंटलं होतं. लग्नाची इच्छा नसतानाही केवळ काही लोकांच्या दबावामुळे त्याला हे लग्न करावं लागल्याचं त्याने म्हंटलं आहे. गेल्या महिन्यातच चैत्रा आणि नागार्जुनच्या मंदिरातील लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. गेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्नगाठ बांधली. मात्र नागार्जुनच्या कुटुंबियांनी चैत्रावर गंभीर आरोप केले आहेत. नागार्जुनला धमकावून हे लग्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर हे प्रकरण कोलारमधील पोलिस ठाण्यात पोहचलं. नागार्जुनच्या कुटुंबियांनी या लग्नाला मान्यता न दिल्यानं चैत्राला त्याच्या घरातही प्रवेश नाकारण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे.

त्याच्या कुटुंबियांनी मला आणि माझ्या कामाबद्ल वाईट शब्द वापरले. एवढचं नाही तर मी त्याला सोडलं नाही तर मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी पोलिस ठाण्यातच जे काही त्यावर चर्चा करण्याची विनंती केली. असं चैत्राने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, चैत्रा कोट्टरू हिने बिग बॉस कन्नडाच्या 7 व्या पर्वात भाग घेतला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने काही मालिकांसाठी कथा लेखन केलं आहे. सुजीदारा या सिनेमातही तिने अभिनय केला आहे.