रणबीर कपूरला मुंबई पोलिसांचा दणका; केली मोठी कारवाई
मनोरंजन

रणबीर कपूरला मुंबई पोलिसांचा दणका; केली मोठी कारवाई

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरला मुंबई पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून त्याची कोट्यवधींची कार ताब्यात घेतली आहे. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी एका हॉटेलात गेला होता. त्यावेळी त्याने आपली कोट्यवधी किंमतीची रेंज रोव्हर कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली. अर्थात त्याची ही चूक तेथे उपस्थित असलेल्या मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आली. अन् त्याने मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही गाडी ताब्यात घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी गाडीच्या चाकांवर लॉक लावलं. लक्षवेधी बाब म्हणजे पोलिसांची ही कारवाई पाहण्यासाठी रणबीरच्या चाहत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान रणवीरच्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

रणबीर काकांच्या निधनानंतर मित्रमंडळींची भेट घेत आहे त्यारम्यान नो पार्किंगमुळं त्याची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून यामध्ये रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.