मनोरंजन

पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला

पुणे : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील निगडी परिसरात घडली आहे. हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोनालीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे. तपासादरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले आहे.

कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *