पुजारा झाला विचित्र पद्धतीने बाद; एकदा व्हिडिओ पाहाच
क्रीडा

पुजारा झाला विचित्र पद्धतीने बाद; एकदा व्हिडिओ पाहाच

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय टीमला तिसऱ्या दिवशी सकाळी झटपट ५ झटके बसले. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं तिसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 26 रन्सवर आऊट झाला. बेन फोक्सनं त्याला सुरेख पद्धतीनं आऊट केलं. त्यापूर्वी भारतीय टीमची नवी वॉल असलेला चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं रन आऊट झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/Ranginenikrish/status/1361202980494610432

मोईन अलीच्या बॉलवर पुजारानं फटका मारला. सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या ऑली पॉपनं तो बॉल अडवून विकेट किपर बेन फोक्सकडं फेकला. पुजारा क्रिजमध्ये परतला होता. पण त्यापूर्वी त्याच्या हातामधून बॅट निसटली होती. त्यामुळे पुजारा रन आऊट होऊन परत फिरावं लागलं. पुजारा फक्त सात रन काढून आऊट झाला.

चेन्नईच्या पिचवर संयमी बॅटिंग करणे अवघड आहे, हे लक्षात येताच ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या आधी आलेला पंत फार कमाल करु शकला नाही. पंत फक्त 8 रन काढून आऊट झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला रहाणे दुसऱ्या डावात झटपट आऊट झाला. रहाणेनंतर रविचंद्रन अश्विनच्या आधी बढती मिळालेला अक्षर पटेलही काही खास करु शकला नाही आणि भारताची अवस्था ६ बाद १०६ अशी झाली होती.

त्यानंतर मात्र, कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनने पिचवर तंबू ठोकला असून दोघांनीही अर्धशतके केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विराट कोहली आणि अश्विनने सातव्या गड्यासाठी नाबाद ९५ धावांची भागीदारी केली आहे. भारताची धावसंख्या ६ बाद २०१ झाली असून भारताकडे आतापर्यंत ३९६ धावांची आघाडी झाली आहे.