संजय दत्तने बायकोला दिलं 100 कोटींचं गिफ्ट; मात्र…
मनोरंजन

संजय दत्तने बायकोला दिलं 100 कोटींचं गिफ्ट; मात्र…

मुंबई : बॉलिवुड अभिनेता संजय दत्तनं आपली बायको म्हणजेच मान्यताला डिसेंबर महिन्यात मुंबईच्या उच्चभ्रू लोकवस्तीतले आलिशान चार फ्लॅट भेट दिले आहेत. जवळपास 100 कोटींच्या घरात या चार फ्लॅट्सची किंमत होती. पण विशेष म्हणजे संजय दत्तच्या बायकोने ही भेट त्याला लगेच परतही केली आहे. मुंबईच्या बांद्रा भागात हे फ्लॅट्स आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पत्नी मान्यता हिनं एका आठवड्यातच ही भेट घ्यायला नकार देत परत केली. मनीकंट्रोलला मिळालेल्या कागदपत्रांवरून हे फ्लॅटचा व्यवहार स्पष्ट होतात. भेटीच्या लेखी करारपत्रानुसार 26.5 कोटी हा सर्कल रेट आहे. किंवा याला सरकारनं ठरवलेली या चार मालमत्तांसाठी किंमतही म्हणता येईल. मात्र ब्रोकर्सच्या मते या मालमत्तांची खरी किंमत 100 कोटीहून जास्त आहे.

हे चार फ्लॅट्स पाली हिल्सच्या इंपिरियल हाईट्स बिल्डिंगमध्ये आहेत. ही बिल्डिंग अतिशय श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांची म्हणून ओळखली जाते. संजय दत्तने घेतलेल्या फ्लॅट्सपैकी दोन फ्लॅट्स हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहेत. याशिवाय अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर दोन पेंट हाऊस आहेत. या गिफ्टची नोंदणी कागदपत्रं Zapkey.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे संकेतस्थळ जाहीररीत्या उपलब्ध असलेल्या मालमत्तांची एकूण किंमत मोजत त्याबाबतच्या माहितीचं व्यवस्थापन करतं.