सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळाली. आज देखील देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी साधारण 322 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधीच्या सत्रात भारतीय बाजारात सोन्याचे दर 47,457 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 68,142 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत तर चांदीचे दर स्थिर आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सातत्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रति तोळा 322 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47 हजार 137 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,457 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,825 डॉलर प्रति औंस आहेत.

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरांत देखील घट झाली आहे. चांदीचे दर 1000 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 67,170 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 26.61 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.