रिहानाच्या समर्थनार्थ उतरला हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू
देश बातमी

रिहानाच्या समर्थनार्थ उतरला हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या एकमेव भारतीय क्रिकेटपटूने अप्रत्यक्षपणे पॉप स्टार रिहानाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. पण इरफान पठाण याने जॉर्ज फ्लॉईडची आठवण करून दिली आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर जगभरात blacklivesmatter आंदोलन झालं असल्याचं इरफान पठाण म्हणाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही घेतली आहे. पॉप स्टार रिहाना, पॉर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पॉप स्टार रिहानाच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा भारताविरुद्ध दुष्प्रचार असल्याचं सांगितलं आहे, तर काही जणांनी रिहानाच्या ट्विटचं समर्थन केलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी प्रतिक्रिया दिली. या सगळ्यांनी शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं असल्याचं सांगतानाच देशाने एकात्मता दाखवायचं सांगितलं.