इरफान खान प्रोड्युसर गिल्ड पुरस्कारनं सन्मानित
मनोरंजन

इरफान खान प्रोड्युसर गिल्ड पुरस्कारनं सन्मानित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. इरफानच्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. इरफान खानने हॉलिवूडच्या मायटी हार्ट, लाइफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, इनफर्नो ज्युरॅसिक वर्ल्ड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या योगदानासाठी २०२१च्या प्रोड्युसर गिल्ड पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून एक मोठी चूक झाली आहे. ज्यामुळे इरफानचे चाहते नाराज आहेत. एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्या एवढ्या मोठ्या अभिनेत्याबाबत अशी चूक कशी काय होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. २४ मार्चला हा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यात दिवंगत अभिनेता इरफान खानच्या आठवणींना उजाळा देत त्याला प्रोड्युसर गिल्ड अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. मात्र यात इरफान नाव चुकीच्या पद्धतीनं लिहिण्यात आलं होतं. इरफानच्या नावाचं स्पेलिंग irrfan khan असं असताना या ठिकाणी त्याचं नाव Irrif Kahn असं लिहिण्यात आलं होतं. ज्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इरफान खान २१ अशा सेलिब्रेटींपैकी होता. ज्यांच्या आठवणींना या पुरस्कार सोहळ्यात उजाळा देण्यात आला. यावेळी ‘मिनारी’साठी ऑस्कर जिंकणारे पहिला आशियाई- अमेरिकन अभिनेता स्टीवन येउनच्या नावाचा उच्चारही चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. या सोहळ्यात हॉलिवूड अभिनेता किर्क डगसल आणि ब्लॅक पँथर चित्रपटातील अभिनेता चॅडविक बोसमॅन यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.