संजय जाधव करणार सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजचे दिग्दर्शन
मनोरंजन

संजय जाधव करणार सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजचे दिग्दर्शन

मुंबई : संजय जाधव पहिल्यांदाच एका वेब सिरिजचे दिग्दर्शन करणार आहे. या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर संजय जाधव अनुराधा या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रथमच वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, ही आमच्यासाठीही फार मोठी गोष्ट आहे. संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. संजय नेहमीच वेगवेगळे, मनोरंजनात्मक विषय हाताळतो. त्यामुळे अनुराधाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. संजयचे दिग्दर्शन, मराठी सिनेसृष्टीतील अतिशय मुरलेले कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू या वेब सीरिजमध्ये आहेत.

अनुराधाबद्दल आणि तेजस्विनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत दिग्दर्शक संजय जाधव सांगतात, या वेब सीरिजबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही. एक सांगेन की, ही एक सस्पेन्स थ्रिलर असून माझ्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि लवकरच अनुराधा प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे तो म्हणजे माझी पहिली वेब सीरिज प्लॅनेट मराठीसारख्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याने पहिल्या मराठी ओटीटी बहुमान मिळवला आहे.