दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल; आयसीएमआरचा दावा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल; आयसीएमआरचा दावा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसेल असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य उद्रेक कमी होईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या अभ्यासानंतर ४० टक्के लोकांनी दुसर्‍या लाटेच्या तीन महिन्यांतच दोन्ही डोस घेतले होते त्यानुसार हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लसीकरणामुळे कोरोना संक्रमणाची तीव्रती ही ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होणार आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात चार गृहीतके विचारात घेता, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संसर्ग-आधारित प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होऊ शकते. विषाणूमध्ये कोणताही बदल झाला नाही तर आधी कोरोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा लागण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत नवीन प्रकारचा विषाणूचा समावेश असू शकतो ज्यामुळे कोविड-१९चे मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्यासाठी हा विषाणू सक्षम आहे.