विकी कौशलच्या सरदार उधमचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

विकी कौशलच्या सरदार उधमचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या सरदार उधम या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटाच्या टीझरमध्ये रोमांचक कथा असल्याचे दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला कागदपत्रे दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. प्रत्येक पासपोर्टवर नावं ही वेगवेगळी आहेत. उदे सिंग, फ्रैंक ब्राजील, शेर सिंग आणि शेवटी उधम सिंग यांच नाव दिसतं. सगळ्यात शेवटी उधम सिंग यांच्या पासपोर्टवर विकीचा चेहरा दिसतो. ही रोमांचक आणि मनोरंजक कथा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.

हा टीझर विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. शहीद भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्ताने, मला त्यांचा मित्र सरदार उधम सिंग- एक माणून, वेगवेगळी नावं, एक मिशनची कथी तुमच्यासमोर आणण्यात अभिमान वाटत आहे, असे त्याने म्हटले आहे. सादर करत आहे सरदार उधम, अशा आशयाचे कॅप्शन विकीने हा टीझर शेअर करत दिले आहे

सरदार उधम सिंग यांच्या कथेवर आधारीत असलेल्या, या चित्रपटात ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकणाऱ्या आणि आपल्या देशवासीयांच्या मृत्युचा बदला घेण्याच्या त्यांच्या धैर्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरदार उधन हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सिरकार यांनी केले आहे. तर राइजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने या अमेझॉन ओरिजिनल मूव्हीची निर्मिती केली आहे.