शाहिदची बायको म्हणते, ‘नवरा घरात आहे पण जवळ नाही’
मनोरंजन

शाहिदची बायको म्हणते, ‘नवरा घरात आहे पण जवळ नाही’

मुंबई : चित्रपटाच्या चित्रिकरण बंद झाल्याने बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर सध्या घरी परतला असून घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहे. खबरदारी म्हणून शाहीद ही काळजी घेत आहे. पत्नी मीरा मुलं मिशा आणि झैन सुरक्षित रहावेत, यासाठी तो ही सर्व काळजी घेतोय. घराबाहेर असल्यामुळे शाहीदने क्वारंटाइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नी मीराने नवरा घरात आहे पण जवळ नाही अशी खंत बोलून दाखविली आहे. इन्स्टाग्राम स्टोअरीवर दोन फोटो पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्रश घरी असला, तरी अजूनही लांब आहे. माझ्यापेक्षा त्याचे त्याच्या स्वेटशर्टवर जास्त प्रेम आहे असे मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले होते. दरम्यान, शाहिद खेळावर आधारीत ‘जर्सी’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील चित्रीकरणासाठी शाहीद चंदीगडमध्ये होता. पण पंजाब, हरयाणामध्ये शेतकरी आंदोलन जोरात सुरु असल्यामुळे दिग्दर्शक गौतम यांनी चंदीगडमधील चित्रीकरण लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

‘जर्सी’ हा तेलुगू चित्रपटाता रिमेक आहे. मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. लॉकडाउनमध्ये घरी असताना सुद्धा शाहीदने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बॉलिवूडमध्ये काही जोडपी नेहमीच चर्चेत असतात. मीरा राजपूर आणि शाहीद कपूर हे अशाच जोडप्यांपैकी एक आहे.