लागिर झालं जी फेम आज्या शितली पुन्हा येणार तुमच्या भेटीला
मनोरंजन

लागिर झालं जी फेम आज्या शितली पुन्हा येणार तुमच्या भेटीला

मुंबई : लागिर झालं जी फेम आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण आणि शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा तुमच्या भेटीला येणार असून ते एका नव्या गाण्यातून एकसोबत थिरकणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘सजलं रूप तुझं,रुजलं बीज नवं उधाण वारं हसतंय धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं पाखरागत उडतंय…..’ अशा गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणत आणि मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या या गाण्याच्या बोल आहेत. प्रेम व्यक्त करण्याची भावना व्यक्त करण्यासाठी या सबंध गाण्यात तसूभरही उणीव भासू दिली नाही. अगदी गावरान आणि त्या गाण्याला साजेशा अशा नजराण्यांची कुठेही कमतरता आढळली नाही. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलेवहिले गाणं आहे.

‘एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. ओंकार याआधी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला, शिवाय ‘चंद्र झुल्यावर’, ‘तू ये साथीला’ याही गाण्यांची दिग्दर्शनाची धुरा ओंकारने साकारली. तसेच निर्माता विश्वजितचे हे मराठी सृष्टीतील दुसरे निर्मित केलेले मराठी गाणे असून याआधी त्याने ‘दिल बुद्धू’ या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे तर गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा ‘चाहूल’ या गाण्यातून सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरेल.