उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. तथापि, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केलं. ” आज हे असयला पाहिजे होते, असं फार वाटतंय, एकच गोष्ट खरोखरच मिस करतेय,” अशा भावना उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. उर्मिला मातोंडकर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील काल उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती दिली होती. त्यानुसार आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, २०१९ मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. पण आता शिवसेनेसोबत त्यांनी नव्याने राजकीय वाटचाल सुरु केली आहे.