सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन लीक; व्हिडीओ पाहाच
मनोरंजन

सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन लीक; व्हिडीओ पाहाच

मुंबई : सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता आहे. अशात सिद्धार्थचा एक इन्टिमेट व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यानं एका वेब सीरिजसाठी हा किसिंग सीन शूट केला होता. मात्र हा सीन पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. तुम्ही तर स्क्रीन तोडून बाहेर याल अशी गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर केल्या जात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रोकन बट ब्‍यूटीफुल या नव्या वेब सीरिजद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही एक सस्पेंन्स सीरिज आहे. या आगामी सीरिजमधील एक किसिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ अभिनेत्री सोनिया राठीचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/kamlovessid/status/1379901140347723777

अलिकडेच तो बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये देखील झळकला होता. या शोमुळं त्याचं फॅन फॉलोइंग कमालीचं वाढलं आहे. त्यानं केलेल्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचे लाखो व्ह्यूज मिळतात. याच दरम्यान, ब्रोकन बट ब्‍यूटीफुल या सीरिजची निर्मिती एकता कपूरनं केली आहे. अलिकडेच या सीरिजचं टायटल ट्रॅक देखील रिलिज झालं होतं. तेव्हा देखील प्रेक्षकांचा असाच उत्साह पाहायला मिळाला होता. आता सीन लीक झाल्यामुळं या सीरिजबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.