कार्तिकच्या धमाका चित्रपटाचा टीझर रिलीज; एकदा पाहाच
मनोरंजन

कार्तिकच्या धमाका चित्रपटाचा टीझर रिलीज; एकदा पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या धमाका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. आजच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टीझरमध्ये कार्तिक एका न्युज अॅकरच्या भूमिकेत दिसतं आहे. टीझरच्या सुरूवातीला कार्तिक न्युजरूममध्ये बसून किंचाळतो आणि बोलतो बंद करा हा कॅमेरा, बंद करा. तो कोणत्या तरी शो साठी नकार देताना दिसत आहे. तर त्याची एडिटर त्याला म्हणते, द शो मस्ट गो ऑन. कार्तिक बोलतो, मी हे नाही करू शकतं. नंतर कार्तिक स्वत:ला सांभाळत कॅमेरा फेस करतो आणि बोलतो, मी आहे अर्जुन पाठक भरोसा २४/७ मधून…मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन.. हा टीझर शेअर करतं मी अर्जुन पाठक आहे. मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन, अशा आशयाचे कॅप्शन शेअक करत कार्तिकने ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या चित्रपटात कार्तिकच्या भूमिकेचे नाव अर्जुन पाठक आहे. या चित्रपटाची पटकथा मुंबईवर आधारीत आहे. यात एक अनोळखी व्यक्ती अर्जुनला फोन करून वरळी सीलिंकवर ब्लास्ट करण्याची धमकी देतो. २२ नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त धमाका या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. या चित्रपटात कार्तिक सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर अभिनेता विकास कुमार आणि विश्वजित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले असून त्यांच्या ट्विटर खात्यावरूनही त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. धमाका नेटफ्लिक्सवर १९० देशांत प्रदर्शित होणार आहे.